स्वप्नातही वाटलं नाही, तसं घडलं; पण चिंता करायची नाही, आता वेळ आलीय! शरद पवारांचा सूचक इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी आंबेगाव-शिरूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी अजित पवार गट आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पुणे जिल्हा खूप मोठा असून सत्तेसाठी लोकांनी साथ सोडली. ज्यांना लोकांनी निवडून दिले त्यांनाही विसरले, असा टोला पवारांनी वळसे-पाटील यांचे नाव न घेता केली.

गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रावादीचे 54 आमदार निवडून आले. त्यातील 44 आमदार पळवून नेण्यात आले. त्यात आंबेगावमधील आमदारही होते. मी दिल्लीत काम करण्याचे ठरवले होते आणि राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना (अजित पवार) दिली. मात्र स्वप्नातही वाटले नव्हते तसे घडले, असे शरद पवार म्हणाले.

सत्ता येते आणि जाते. परंतु सर्वसामान्य माणसासाठी काय भूमिका घेतली हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे काय घडले याची चिंता करायची नाही. आता वेळ आली आहे, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांना एक प्रकारे इशाराच दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)