शेअर बाजारात काही दिवसात घसरण दिसून आली होती. गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ दररोज लाल होत होता. यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. गटांगळे खाणारे शेअर पुन्हा एकदा शिडी चढून वर जावू लागले. यातील एका शेअरवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. या शेअरने हजारांमध्ये खेळणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले आहे. स्मॉलकॅप कंपनीचा हा शेअर एका दिवसामध्ये 3 रुपयांवरून थेट सव्वा दोन लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वात महागडा म्हणून मिरवणाऱ्या एमआरएफ या कंपनीचा शेअरही त्याच्यापुढे फिका वाटू लागला आहे.
भांडवली बाजारमध्ये इतिहास रचणआऱ्या या कंपनीचे नाव एलसिड इन्व्हेस्टमेंट लि. (Elcid Investments ltd) आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून या कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवरून थेट 2,36,250 रुपायांवर पोहोचले आहे. आजही या शेअरला अपर सर्किट लागले आहे. त्यामुळे हा शेअर थेट 2,48,62.50 रुपयांवर ट्रेड होत आहे. याचाच अर्थ दोन दिवसात हा शेअर 70,27,166 टक्क्यांनी वाढला आहे.
बॉम्बे स्कॉक एक्सचेंजच्या वेबसाईटनुसार, एलसिड इन्व्हेस्टमेंट लि. कंपनीचा 52 आठवड्याचा निच्चांक 3.37 रुपये आहे. जुलै महिन्यामध्ये हा शेअर 3.21 रुपयांवर होता. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर पुन्हा एकदा सुचिबद्ध करण्यात आला. त्यावेळी कंपनीची बुक प्राईज 2,25,000 रुपये एवढी होती. सुचिबद्ध झाल्यापासून या शेअरला अपर सर्किट लागले आहे. आगामी काळात हा शेअर 5 लाखांच्याही वर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
एलसिड इन्व्हेस्टमेंट लि. कंपनीचा शेअर 52 आठवड्याच्या निच्चांकावर असताना एखाद्याने त्यात 10 हजार गुंतवले असते तर त्याला 2,967 शेअर मिळाले असते आणि आज त्याची किंमत 70 कोटींच्याही पार गेली असती. ही एक स्मॉलकॅप कंपनी असून याचे भागभांडवल 4 हजार 725 कोटी रुपये आहे.
हा कंपनीचा शेअर रॉकेट का झाला यामागे अनेक कारणे देण्यात आले आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे या कंपनीकडे एशियन पेंटस लि. कंपनीचे 2,83,13,860 शेअर आहेत. याचाच अर्थ एलसिड इन्व्हेस्टमेंट लि. कंपनीची एशियन पेंटस लि. कंपनीमध्ये 2.95 टक्के भागिदारी आहे. आज याचे बाजारमुल्य 8 हजार 500 कोटींवर आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.