घृष्णेश्वर, भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन उदयसिंग राजपूत यांचा प्रचार सुरू

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान 20 दिवसांवर येऊन ठेपले आहे. यादरम्यान जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेले भद्रा मारुती रत्नपूर आणि वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात कन्नड सोयगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. याप्रसंगी तालुक्यातील जनतेचा विश्वास आणि शिवसेना पक्षाने दुसऱ्यांदा दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याची भावना राजपूत यांनी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील प्रत्येक गावात, तांड्यावस्तीवर विकामकामे केली असून, त्याची पावती जनता मतदानरूपी आशीर्वादातून देणार आहे. मात्र, भगवंतांची कृपा आणि साधूसंतांचे आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे. आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, कुटुंबीय, मित्रपरिवार आदी पदाधिकारी मिळून संपूर्ण तालुका पिंजून काढू, असे ते म्हणाले. यावेळी रामराजे देशमुख, गोकुळ राठोड आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीची आज अंधानेर गणात प्रचार यात्रा
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदयसिंग राजपूत हे गुरुवार, 31 रोजी महाविकास आघाडीची गुरुवारी अंधानेर गणात प्रचार यात्रा काढणार आहेत.

सकाळी अंधानेर मुंडवाडी, मुंडवाडी तांडा, कोळवाडी, सीतानाईक तांडा कळंकी, वडनेर, आंबा तांडा, आंबा, अंबाला, उपळा कालीमठ, भांबरवाडी, सातकुंड आणि तेलवाडी असा प्रचार करतील.