पैठण विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाची आज छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत 78 अर्जापैकी 11 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. आता निवडणूक रिंगणात एकूण 51 उमेदवार उभे आहेत.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या ‘संतपीठ’ इमारतीत आज निवडणूक निर्णय अधिकारी निलम बाफना यांच्या मुख्य उपस्थितीत सहायक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सारंग चव्हाण यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
छाननी दरम्यान मिंधे गटाचे उमेदवार विलास संदिपान भुमरे यांच्या शपथपत्र विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांनी आक्षेप दाखल केला होता. त्याची संक्षिप्त चौकशी करण्यात आली. आणि सदर आक्षेप अर्जावर दुपारी 3.44 वाजता स्वतंत्र निर्णय पारित करण्यात आला. त्यानुसार आक्षेप अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे 4 तास मिंधे गटाची एकच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत एकूण 78 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. सर्व छाननी प्रक्रियेनंतर आता 51 उमेदवार उभे आहेत.