भाजपच्या महिला नेत्याकडून वृद्ध सासऱ्याचा शारीरिक छळ, व्हिडिओ व्हायरल

पंजाबच्या पटियाला येथे भाजपच्या महिला नेत्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. किचनध्ये चहा बनवण्यासाठी गेलेल्या 81 वर्षीय सासऱ्याला महिलेने मारहाण करत ढकलून दिले. ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताराबाई उर्फ मार्गारेट डिसूझा असे महिला नेत्याचे नाव आहे तर जन विजय सिंह असे पीडित सासऱ्याचे नाव आहे. ताराबाई ही पटियाला येथे भाजपची ब्लॉक अध्यक्ष आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ताराबाईवर टीका होत आहे. नेटिझन्सनी ताराबाईच्या वर्तनाचा निषेध केला आहे. सिंग हे स्वतःसाठी चहा बनवण्यासाठी किचनध्ये गेले होते. यावेळी ताराबाईने त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला. याबाबत ताराबाई किंवा भाजपकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.