विवो मोबाईलचा खिशात स्फोट झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ग्रेटर नोएडात घडली आहे. ऋषी कुमार असे जखमी तरुणाचे नाव आहे. ऋषी कामावरून घरी जात असतानाच ही घटना घडली. ऋषीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऋषी कुमार नेहमीप्रमाणे कामावरून घरी चालला होता. यावेळी त्याने आपला विवो कंपनीचा मोबाईल खिशात ठेवला होता. कारमध्ये बसत असतानाच खिशात मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचे कपडे जळाले असून पाय गंभीर भाजले. सदर मोबाईल तीन वर्षे जुना होता.
ऋषीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला खोलवर जखमा झाल्या आहेत. ऋषीने हा मोबाईल त्याने तीन वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांना विकत घेतला होता.