कानपूरमधील एकता गुप्ता हत्याकांड प्रकरणी पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी जिम ट्रेनर विमल सोनी याची अनेक महिलांशी जवळीक असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी विमलचा मोबाईल तपासला असता तो महिलांशी अश्लील चॅटही करीत असल्याचे समोर आले आहे.
एकताचा पती राहुलनेही जिम ट्रेनर विमलचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे म्हटले होते. तसेच विमल अनेक महिलांना ऑफिसर्स क्लबमध्ये घेऊन जात असल्याचा आरोपही केला होता. मात्र राहुलने विमल आणि एकता यांच्यामध्ये प्रेमप्रकरण असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
या हत्येमागे काही तरी मोठे कारण असून याप्रकरणी पोलिसांनी संशयास्पद भूमिका असणाऱ्या अन्य बाबींचाही तपास करावा. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी राहुल यांनी केली आहे.
जिम ट्रेनर विमल सोनी याने 24 जून रोजी एकता गुप्ता याची हत्या केली होती. हत्येच्या चार महिन्यांनंतर हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. यानंतर पोलिसांनी आरोपी विमल सोनीला अटक केली. आरोपीने दिलेल्या माहितीवरून ऑफिसर्स क्लबमधून एकताचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.