लेबनॉनच्या हिजबुल्लाह बंडखोर गटाच्या प्रमुख पदी नईम कासीमची निवड करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हसन नसराल्लाह मारला गेला होता. नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिन्यानंतर हिजबुल्लाहने आपला नेता निवडला आहे.
हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. हसन नसराल्लाहने जवळपास तीन दशके हिजबुल्लाह गटाचे नेतृत्व केले. नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाहने लेबनॉनमध्ये आपली मुळे मजबूत केली. कासिम हा बराच काळ नसरल्लाहचा सहाय्यक म्हणून काम करत होता. नसरल्लाहच्या मृत्यूनंतर तो हिजबुल्लाचा कार्यवाहक नेता म्हणून काम करत होता. आता नईम कासिम हसन नसराल्लाहची जागा घेणार आहे.
नसराल्लाहची हत्या ही लेबनॉनमधील शिया समुदायाला मोठा धक्का मानले जाते. नसराल्लाहच्या हत्येपूर्वी इस्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची हत्या केली होती. अशा परिस्थितीत नईम कासिम इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासोबतच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होता.