तमिळ अभिनेता थलपती विजयच्या राजकीय पक्षाच्या एन्ट्रीने दक्षिण हिंदुस्थानातील राजकारणाला नवीन कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. या पक्षाने भाजपच्या चिंतेत भर टाकली आहे. मात्र नवीन पक्षाच्या विचारसरणीतील चित्रपटातील संवादांच्या वापरावरुन वादाला तोंड फुटले आहे. पक्षाच्या प्रचारात चित्रपटातील संवाद वापरण्यावर काँग्रेसनेही आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी थलपती विजयच्या ‘तमिलगा वेत्री कझगम’ या नवीन राजकीय पक्षाचे स्वागत केले आहे. याचवेळी त्यांनी पक्षाच्या विचारसरणीमध्ये चित्रपटातील संवाद वापरण्याला विरोध केला आहे.
थलपती विजयच्या पक्ष स्थापनेच्या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संमिश्र प्रतिक्रिया दिली. थलपती विजय यांनी नवीन पक्ष काढला आहे. मी याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी आमच्याशी सत्ता आणि जागा वाटपाबद्दल बोलणी केली. यात सकारात्मक घडेल, अशी आशा आहे. याचवेळी पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलावेसे वाटते, ते म्हणजे थलपती विजय यांनी चित्रपटातील संवादांचा पक्षाच्या प्रचारासाठी वापर करू नये, अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली.
यापूर्वी भाजपने चित्रपटातील संवाद वापरण्यावर आक्षेप घेतला होता. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या विरोधाला थलपती विजयच्या पक्षाला तोंड द्यावे लागत आहे.