मार्क माय वर्ड! 26 तारखेनंतर शिंदे आणि त्यांचे लोक वनगांसारखे रडताना दिसतील; संजय राऊत यांचा घणाघात

मिंधे गटाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने पालघर मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडले. ते डिप्रेशनमध्ये गेले असून सोमवार सायंकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. याच श्रीनिवास वनगा यांच्यासारखी वेळ एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांवर येणार आहे. 26 तारखेनंतर शिंदे आणि त्यांची लोक वनगांच्या भूमिकेमध्ये दिसतील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे श्रीनिवास वनगा आमदार झाले. वडिलांच्या निधनानंतर भाजपने वनगा कुटुंबाला वाऱ्यावर सोडले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वनगा कुटुंबाला दत्तक घेतले. श्रीनिवास वनगा यांना उभे केले, लोकसभेला ताकद दिली, स्वत: प्रचारात उतरले. दुर्दैवाने पराभव झाल्यावरही त्यांना विधानसभेत आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना मिळाला पाहिजे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. तो शब्द त्यांनी पूर्णही केला.

मिंधेंनी तिकीट कापलं; डिप्रेशनमध्ये गेलेले आमदार श्रीनिवास वनगा 13 तासांपासून बेपत्ता, दोन्ही फोन स्विच ऑफ

श्रीनिवास वनगा शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण ते महाशय सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. कुठल्यातरी टेबलावर नाचतानाही आम्ही त्यांना पाहिले. त्यावेळी त्या भागातील अनेक शिवसैनिकांना रडू कोसळले होते. ही कर्माची फळे असून अनेकांना भोगावी लागतील. एकनाथ शिंदे यांनाही भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर शिंदेंनाही रडू कोसळेल. ज्या भूमिकेत वनगा आहेत, त्याच भूमिकेत शिंदे आणि त्यांची लोक रडताना दिसतील. मार्क माय वर्ड, असेही राऊत ठामपणे म्हणाले.

उद्यापासून फुटणार प्रचाराचे फटाके, जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेच्या शिलेदारांचे उमेदवारी अर्ज