ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी चितळे बंधूंच्या बाणेरमधील मिठाईच्या दुकानावर दरोडा टाकून दीड लाखाची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी शॉपचे शटर उचकटून रोकड लंपास केली आहे. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारस औंध-बाणेर रोडवेरील दुकानात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बाणेर परिसरात चितळे बंधू यांचे मिठाई विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री कामगारांनी दुकानात हिशेब केल्यानंतर काही रक्कम गल्ल्यात ठेवली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यात असलेली 1 लाख 41 हजारांची रोकड चोरून पोबारा केला.