Breaking News – वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी; दुर्घटनेत 9 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

वांद्रे स्थानकावर दररोज अनेक प्रवासी ये-जा करतात.

दिवाळी सण जवळ आल्याने तसेच शाळांनाही सुटी लागल्याने गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रविवारी सकाळी वांद्रे रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी झाली. त्यामुळे वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर जखमींना ताताडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान वांद्रे टर्मिनसच्या फलाट 1 वर ही घटना घडली. घटनेनंतर काही होतेय ते कोणालाच समजत नसल्याने गोंधळ वाढला आणि सैरभैर होऊन लोक पळत होते. वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी सकाळी 3 वाजेपासून प्रवासी फलाटावर आले होता. ही ट्रेन सकाळी 5.10 वाजता सुटते. गाडी फलाटात आल्यानंतर ही घटना घडली. सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी एक्सप्रेस फटालावर आली. त्यानंतर गाडीत चढण्यासाठी अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. अनेकांकडे आरक्षण नसल्याने जनरल डब्यातून प्रवास करत गावाला जाण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. त्यामुळे डब्यात चढताना चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.