Maharashtra Election 2024 – भाजपचा विरोध, तरीही नबाव मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तरीही नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम असून जनता माझ्यासोबत आहे असे मलिक म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मलिक म्हणाले की, नवाब मलिक म्हणाले की 29 ऑक्टोबरला मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघासाठी मी नामांकन अर्ज भरणार आहे. इथून निवडणूक लढवावी असा आग्रह इथल्या जनतेने माझ्याकडे केला आहे. मानखुर्दमध्ये गुंडगिरी आणि अंमली पदार्थांचा बाजार सुरू आहे आणि इथली जनता यावर खुप नाराज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार . मला कोण विरोध करतंय याची मला परवा नाही, जनता माझ्यासोबत आहे आणि मी निवडणूक लढवणार असे मलिक म्हणाले.