दिवंगत रतन टाटा यांची 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती, इच्छापत्रात लाडका कुत्रा आणि शंतनू नायडूचे नाव

रतन टाटा यांचे निधन होऊन एक महिना झाला आहे. आता त्यांच्या इच्छापत्रासंदर्भात एक बातमी समोर आली आहे. आपल्या इच्छापत्रात रतन टाटा यांनी आपला पाळलेला कुत्रा, कर्मचारी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांच्या नावे काही आपली मालमत्ता नावे केली आहे. रतन टाटा यांची एकूण संपत्ती 10 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. रतन टाटा यांनी आपली संपत्ती टाटा फाऊंडेशन, भआऊ जिमी टाटा, बहीण शिरी आणि डीना जीजीभॉय, घरातले नोकर आणि इतरांच्या नावे केली आहे.

लाडक्या कुत्र्याच्या नावे काय
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रतन टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात आपल्या लाडका कुत्रा टिटोचा उल्लेख केला आहे. टिटोची संपूर्ण जबाबादारी स्वयंपाकी राजन शॉ यांच्याकडे सोपवली आहे. टाटा यांच्याकडील एका कुत्र्याचे निधन झाल्यानंतर टाटा यांनी टिटोला दत्तक घेतलं होतं. टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात आपला बटल सुबैय्या यांच्या नावे काही संपत्ती केली आहे. 30 वर्षांपासून सुबैय्या टाटा यांची देखभाल करत होते.

शंतनू नायडूच्या नावे काय

टाटा यांचे एक्झुक्युटिव्ह असिस्टंट शंतून नायडू याचेही नाव टाटा यांच्या इच्छापत्रात आहे. शंतनूसाठी टाटा यांनी कंपनीयनशिप वेंचर गुडफेलोमधली काही शेअर्स सोडले आहेत. तसेच शंतूनच्या परदेशी शिक्षणाचा सर्व खर्चही माफ केला आहे.

रतन टाटा यांची संपत्ती
रतन टाटा यांच्याकडे अलिबागमध्ये दोन हजार स्के. फुटाचा सी फेस बंगला होता. मुंबईत जुहू तारा मार्गावार दोन मजली घर, 350 कोटी रुपयांहून अधिक एफडी, टाटा कंपीने शेअर्स होते.

20-30 गाड्या

रतन टाटा यांच्याकडे 20 ते 30 गाड्यांचा ताफा होता. त्यात अनेक अलिशान गाड्यांचाही समावेश होता. या गाड्या सध्या हेलकाई निवास आणि कोलाब्यातील ताज वेलिंग्टन म्यूज सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.