बाबा सिद्दिकी हत्याकांड; लुधियानातून आणखी एक जण ताब्यात

बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेने लुधियाना येथून आज सुजित सुशील सिंग (32) याला ताब्यात घेतले. सुजितला मुंबईत आणून त्याला अटक करण्यात येईल. दरम्यान, या गुह्यातील अटक आरोपी राम कनोजिया याच्या पळस्पे येथील घरातून पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल सापडले आहे.

सुजित हा मूळचा लखनौचा असून गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईच्या छेडानगर परिसरात राहतो. तो एके ठिकाणी नोकरी करतो. बाबा सिद्दिकी यांची हत्या होण्याच्या एक महिनापूर्वी सुजित त्याची सासुरवाडी असलेल्या लुधियाना येथे पळून गेला होता; पण त्याचाही या गुह्यात सहभाग निश्चित झाल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियाना गाठून उचलले. सुजित हा या गुह्यातील पाहिजे आरोपी झिशान अख्तर याच्या संपका&त होता. मग तो नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांच्या संपका&त आला. सुजित आणि नितीन व राम यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती. राम आणि नितीन पकडले गेल्यानंतर ही बाब समोर येताच त्याला आज ताब्यात घेण्यात आले. सुजितला मुंबईत आणून चौकशी केल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

रामच्या घरात पिस्तूल सापडले
राम कनोजिया याच्या पळस्पे येथील कोळगे गावातल्या घरात पोलिसांना आणखी एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले आहे. त्यामुळे या गन्ह्यात जप्त झालेल्या पिस्तुलांची संख्या चार झाली आहे.

नऊ आरोपींच्या कोठडीत वाढ
या गुह्यातील नऊ आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उद्या शनिवारी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.