27 फ्लाईट्संना बॉम्बने उडवण्याची धमकी; स्पाईसजेट, इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचा समावेश

गेल्या काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी मिळत आहेत. आता पुन्हा 27 फ्लाईट्संना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यात स्पाईसजेटच्या 7, इंडिगोच्या 7, एअर इंडियाच्या 6 आणि विस्ताराच्या 7 फ्लाईट्सचा समावेश आहे.

या धमक्यानंतर अनेक विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या 6, स्पाईसजेट, विस्तारा आणि इंडिगोच्या प्रत्येकी 7 फ्लाईट्स प्रभावित झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इंडिगो, एयर इंडिया, विस्तारा, स्पाइसजेट, एलायन्स एयर आणि अकासा एयरच्या 95 फ्लाईट्संना धमकी आली होती. त्यानंतर पुन्हा या फ्लाईट्संना धमकी आली आहे.

गेल्या 9 दिवसांत हिंदुस्थानी एअरलाईन्संना 200 हून अधिक जास्त फ्लाईट्संना बॉम्बेची धमकी मिळाली होती. त्यातील बहुतांश धमक्या या सोशल मीडियातून आल्या होत्या. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या होत्या.