शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या सरकारला धडा शिकवा

विरोधकांनी स्वार्थ साधण्यासाठी महाविकास आघाडीला फोडण्याचे काम केले. 50 खोक्यांचा वापर करून पक्ष फोडला, चिन्ह चोरले, मात्र 84 वर्षांच्या योथ्याने पक्ष तुटू दिला नाही. पुन्हा व्यवस्थित बांधला आणि लोकसभेत भरघोस मते घेऊन जिंकवला देखील. 1500 रुपये महिला भगिनींना देऊन जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले, एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने सोयाबीनची माती करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकारने केले. म्हणून युती सरकारला मतदारांनी धडा शिकवा आणि कोरोना काळात आपल्या सर्वांच्या प्राणाचे रक्षण करणाऱ्या आमदार राजेश टोपेला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले, घनसावंगी येथे नामनिर्देशन दाखल केल्यानंतर आयोजित सभेत केले.

यावेळी खासदार संजय जाधव, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, मिलिंद आव्हाड, डॉ. निसार देशमुख, उत्तम पवार, भीमराव हत्तीआंबीर, नंदू देशमुख, सतीश टोपे आदिची उपस्थिती होती.

डॉ. कोल्हे म्हणाले की, आमदार टोपे यांच्याकडे ऊस कारखाने, शैक्षणिक संस्था असताना हा माणूस तत्वाच्या आणी निष्ठेच्या बाजूने उभा राहिला. म्हणून या निवडणुकीत निळेला मत द्या आणि गद्दाराला धडा शिकवा. पूर्वी इन्कम टॅक्स, ईटी केवळ सिनेमात पाहायला मिळायचे. मात्र आता विरोधक याचा वापर आमदार खासदार फोडायला करत आहेत. 50 खोक्यात महाराष्ट्र विकला गेला. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. महिला भगिनीना 1500 रुपये महिना देऊन सोयाबीनचे भाव पाडण्यात येतात. जिवनावश्यक वस्तुवर जीएसटी लावली जाते. खोबरे300, गोडेतेल 140 रुपये लिटर केले. एका खिशातून काढायचे आणी दुसऱ्या खिशात टाकायचे हा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर 186 निर्णय घेतले जातात. आदल्या रात्री घडाघड निर्णय घेऊन निवडणुका जिंकता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 2014 सालाची तुलना जर केली तर सोयाबीन तसेच कापसाचे भाव या सरकारने उतरवले. इतकेच नाही तर जर कांदा, टमाटा याचे भाव वाढले तर ते बाहेर देशातून आयात करून शेतकयांची घोर फसवणूक सरकारने केली, देश कोविड संकटात सापडला तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतःच्या कुटुंबावर ओढवलेले संकट बाजूला सारले, आई मरण पावल्याचे दुश्ख विसरून तीन दिवसांत विधी आटोपून राज्याला कोरोनाच्या संकटातून सावरले. राज्याला अशा सच्चा माणसाची गरज आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी घनसावंगी येथे आलो होतो, तेहाब राजेश टोपे यांचा विजय निश्चित होता. आता आपले चिन्ह लोकसभेत गावागावात पोहोचले आहे. अजून महायुतीचा उमेदवार ठरत नाही, याचा अर्थ समजून घ्या. चांगल्या निर्मळ मनाच्या माणसाला विरोध करणे अवघड असते. महाविकास आघाडी सरकारचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केले.

जीवनाश्यक वस्तूंचे भाव वाढवले

कोरोना काळात कोणीही कोणाला मदत करत नसताना सर्वाच्या मदतीला आमदार राजेश टोपे यावले. महिला भगिनींना 1500 रुपये देऊन सोयाबीनसह कापसाचे भाव कमी केले. गोडतेलासह इतर आत्यावश्यक वस्तूंचे भाव वाढविल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले.

सरकारमधील मंत्री टक्केवारी घेणारे

आमचे काही लोक इकडे तिकडे गेले, मात्र काही दिवसांतच सर्व एका मांडवात दिसतील, काही स्वार्थासाठी पक्ष सोडूनही जातात. मात्र आपल्या जिल्ह्यात कोणीही फुटलं नाही. सर्व शिवसेनेला आणि उध्दव ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. लोकसभेत चपराक बसली आणि यांना लाडकी बहीण आठवली. युती सरकारच्या काळात सोयाबिनला भाव नाही. 100 चा बॉण्ड 500 ला झाला. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे. सरकारचे सर्व मंत्री टक्केवारी घेणारे आहेत. सतत 5 वेळा निवडून येणारे आमदार राजेश टोपे हे रात्रंदिवस जनतेचे काम करणारा विकास पुरुष आहे. सोबतीला राहून काम करू असे ते म्हणाले.

घनसावंगी तालुक्यात रांजणी ते राजाटाकळी पर्यंतचा 365 कोटींचा सिमेंट रोड केला. तसेच विविध उपक्रम राबविले. आरोग्य, विज, शैक्षणिक, साठवण तलाव, सिंचन, पे मजल योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजनासह विविध विकासाचे काम मतदार संघात केल्याचे आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. गोदावरी 60 किमी मध्ये बॅरेजस बांधले. सिंचनामुळे सर्वात जास्त उसाची शेती आपल्याकडे होत आहे. अंबड, घनसावंगी येथे 100 बेड व महाकाळा, तीर्थपुरी येथे 50 बेड हॉस्पिटल उभारले. असल्याचे आमदार टोपे म्हणाले