ओरिएंटल इन्शुरन्समध्ये कर्मचाऱयांचे धरणे आंदोलन; प्रलंबित वेतनवाढ, न्यू पेन्शन स्कीम योजनेसह अन्य मागण्यांसाठी कार्यालयातच ठिय्या

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ, न्यू पेन्शन स्कीम योजना व अन्य मागण्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱयांनी भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली चर्चगेट येथील ओरिएंटल हाऊस कार्यालयातच धरणे आंदोलन केले. या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराच ओरिएंटल इन्शुरन्स विमा कर्मचारी सेना व स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस संजय शिर्के यांनी दिला.

ओरिएंटल इन्शुरन्स कर्मचाऱयांची गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढ प्रलंबित आहे. 14 टक्के न्यू पेन्शन स्कीम योजना आणि 30 टक्के फॅमिली पेन्शन योजना यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली विमा कर्मचारी सेनेचा पाठपुरावा प्रशासनाकडे सातत्याने सुरू आहे. या मागण्यांकरिता प्रशासनाला जाग आणण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स पंपनीच्या कार्यालयातच कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन केले.

ओरिएंटल इन्शुरन्स भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस तसेच स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस संजय शिर्पे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात न्यू इंडियाचे कौस्तुभ कुलकर्णी, जीआयसीचे अंकुश कदम, नॅशनल इन्शुरन्सचे संजय डफळ, युनायटेड इन्शुरन्सचे अजय दळवी, ओरिएंटल इन्शुरन्सचे सचिन खानविलकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनाला कर्मचाऱयांचा मोठा प्रतिसाद लाभला. सभेचे सूत्रसंचालन उमेश सोमठाणकर यांनी केले, तर संजय शिर्के यांनी आभार मानले.