वरळीत आले भगवे तुफान…

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला अलोट गर्दी उसळली होती. अर्ज भरताना आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसेच शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, आशीष चेंबूरकर, माजी महापौर महादेव देवळे, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, हेमांगी वरळीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.