सोने-चांदीच्या वाढीला अखेर ब्रेक

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. परंतु, गुरुवारी या वाढीला अखेर ब्रेक लागला. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 531 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 78,161 रुपयांवर आला. तर चांदीच्या भावात सुद्धा 1442 रुपयांची घसरण झाल्याने चांदी प्रति किलो 97,420 रुपये किलोवर आली आहे. यावर्षी सोन्याच्या दरात तब्बल 15 हजारांपर्यंत वाढ झाली आहे.