देशभरातील 85 विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीची मालिका सुरूच आहे. आताही एअर इंडिया, इंडिगोसह 85 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. एअर इंडियाची 20 विमाने, 20 इंडिगो, 20 विस्तारा आणि  25 अकासाच्या विमानांचा समावेश आहे. सोमवारीही विमाने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सरकार सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी अलिकडे एका मुलाखतीत सांगितले. मागील 9 दिवसांत 170 पेक्षा जास्त उड्डाणांना धमक्या मिळाल्या आहेत.