विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कश्मीरात दहशतवादी हल्ले कमी झाले नाहीत. गुरुवारी जम्मू कश्मीर मधल्या बारामुल्ला येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे तसेच चार जवान जखमी झाले आहेत.
Terrorist attack on an Army vehicle which was part of a convoy in J&K’s Baramulla in which a civilian porter has been killed. Four soldiers have also been injured in the attack. More details awaited: Army Officials pic.twitter.com/WCI5pCa2RS
— ANI (@ANI) October 24, 2024
रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबरला रात्री गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या पाच कामगारांसह एका डॉक्टराचा या मृतांत समावेश आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, त्यांना श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेले