उदय सामंत जिल्हाचे पालकमंत्री असताना रत्नागिरी तालुक्यातील आरोग्य व रस्त्याची दयनीय अवस्था झाली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी केली. तसेच ही यांची संस्कृती हीच सामंत संस्कृती या निवडणूकीत नष्ट करायाची आहे असेही साळवी म्हणाले. राजापूर येथे आयोजित सभेत साळवी यांनी ही टीका केली आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीपदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडीकडून आज राजापूर मतदारसंघासाठी आमदार राजन साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
साळवी म्हणाले की, नियोजनाच्या निधीबाबत पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. डोंगरी विकास योजनेतील एक पैसाही दिला नाही. आज खोटी आश्वासने देऊन लोंकांना खोटी पत्र देऊन त्यांची दिशाभूल करीत पक्ष पवेश करून घेत आहेत. जिल्हाचे पालकमंत्री असताना रत्नागिरी तालुक्यातील आरोग्य व रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ही यांची संस्कृती हीच सामंत संस्कृती या निवडणूकीत नष्ट करावयाची आहे. आर्म्हीं केलेल्या कामाचे श्रेय मात्र घेतले जात असल्याचा आरोप आमदार राजन साळवी यांनी केला.
महाविकास आघाडीकडून राजापूर मतदार संघासाठी विद्यमान आमदार आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर केली. गुरूवारी साळवी यांनी आपला उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. राजन साळवी म्हणाले की, सामंत संस्कृती ही रत्नागिरीकर अनुभवत असून ती राजापूरात चालू देणार का? येत्या 20 नोव्हेबर रोजी ही संस्कृती गाडून टाका असे आवाहन केले. गेल्या पंधरा वर्षात केलेल्या विकासासंदर्भात सांगताना त्यांनी देवस्थान, रस्ते व आरोग्याच्या समस्यां सोडविल्या आहेत. माझ्या कामाची दखल विधानसभेत घेतली गेली आहे. आणि आम्ही केलेल्या कामाचा श्रेय लाटण्याचा पयत्न सामंत बंधुकडून केला जात आहे. मी शिंदे गटात येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. मी दाद देत नसल्याचे पाहून एसीबी कडून चौकशी लावली. यावेळी माझ्याकडे चौकशीत काय मिळाले तर माझी निष्ठा. एकवेळ राजन साळवी जेलमध्ये जाईल मात्र कधीही आपली निष्ठ विकणार नाही. यावेळी काय सापडलं तर माझे दैवत असलेल्या बाळासाहेबांची प्रतिमा. बाळासाहेबांच्या प्रती तुमची निष्ठा असल्याने आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहत मला पाठीबां दिला हाच माझा विजय आहे. आणि यावेळी महाविकास आघाडीची सत्ता येणार म्हणजे येणारच असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.
आमदार साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी राजापूरची ग्रामदेवता श्रीधोपेश्वरचे दर्शन घेतले. व जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूरचे नितिन बानगुडे पाटील, नेहा माने, महमंद रखांगी, राष्ट्रवादीचे आबा आडिवरकर, महमंद रखांगी, महेश सपे, अनिल भोवड, यांच्यासहीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.