महाविकास आघाडी 200हून अधिक जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा विश्वास

चोरयुती हरणार आणि महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच जनतेनेही महायुतीला सत्तेतून बाहेर काढण्याचे ठरवले आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

एएनआयशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे जागावाटपाचा प्रश्न सुटला आहे. आम्ही मेरिटवर निवडणूक लढवू. महाराष्ट्रात जागावाटप झाले असून महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार. चोरयुतीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, त्यांना आम्ही सत्तेतून बाहेर काढू. जनतेनेही महायुतीला सत्तेतून काढण्याचे ठरवले आहे.