भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महायुतीत बिघाडी; मिंधेंच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांचा अर्ज

जागावाटपाचा तिढा न सुटल्याने महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी सुरू असतानाच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मिंधे गटाचे आमदार शांताराम मोरे यांच्या समोर भाजपा युवती मोर्चा तालुका अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आव्हान कडवे आव्हान उभे केले आहे. स्नेहा पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी त्यांनी आपला अर्जही दाखल केला.

भाजपचे माजी केंद्रीय कपिल पाटील यांच्या कट्टर समर्थक स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी कपिल पाटील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.

Maharashtra election 2024 – ठाण्यात भाजपला ‘पाटणकर’ काढा; मिलिंद पाटणकर अपक्ष लढणार; केळकरांना आव्हान

भिवंडी ग्रामीणमध्ये मिंधे गटाचे शांताराम मोरे हे विद्यमान आमदार असून जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव नाही. त्यामुळे आधीच भीतीचा गोळा त्यांच्या पोटात आला असतानाच आता भाजपच्या स्नेहा पाटील या रिंगणात उतरल्या आहेत. पाटील या काल्हेर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून त्यांच्या भूमिकेमुळे मिंधे गट हादरला आहे.

भाईंदरमध्ये आचारसंहितेची ऐशी की तैशी; भाजप आमदार गीता जैन यांच्या भावासह जिल्हाध्यक्षावर गुन्हा