Maharashtra election 2024 – ठाण्यात भाजपला ‘पाटणकर’ काढा; मिलिंद पाटणकर अपक्ष लढणार; केळकरांना आव्हान

दुसऱ्या पक्षांची फोडाफोडी करणाऱ्या भाजपवर ठाण्यात ‘पाटणकर’ काढा पिण्याची वेळ ऐन विधानसभा निवडणुकीत आली आहे. तब्बल 35 वर्षे भाजपमध्ये विविध पदे भूषवणारे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात शङ्क ठोकला आहे. ठाणे शहर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून भाजपचे संजय केळकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

दोन वेळा पदवीधर व तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या संजय केळकरांविरोधात भाजप कार्यकत्यांमध्ये प्रचंड धुसफूस निर्माण झाली आहे. अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली असून मिलिंद पाटणकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी मिलिंद पाटणकर अर्जदेखील घेतला असून लवकरच ते हा अर्ज दाखल करणार आहेत. पाटणकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने केळकर समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाईंदरमध्ये आचारसंहितेची ऐशी की तैशी; भाजप आमदार गीता जैन यांच्या भावासह जिल्हाध्यक्षावर गुन्हा

माझी पक्षाला किंमत नाही

भाजपमध्ये आपण गेली 35 वर्षे काम केले, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीसपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली, ठाणे महापालिकेमध्ये उपमहापौर पदाची घुरादेखील यशस्वीपणे सांभाळली. शहराच्या विकासाचे प्रश्न महासभेत मांडले, पण पक्षाला माझी किंमत नाही, त्यामुळेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे मिलिंद पाटणकर यांनी सांगितले. संजय केळकर हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मग माझ्यासारख्या कार्यकत्यांला यावेळी तिकीट दिले असते तर काय बिघडले असते, असा सवालही त्यांनी केला.

ओवळा-माजिवड्यातही दे धक्का

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून मिंधे गटाचे प्रताप सरनाईक यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्याविरोधात भाजपचे सीताराम राणे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लवकरच ते उमेदवारी अर्ज देणार असल्याने मिंधे गटाचे टेन्शन वाढले आहे.

Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन