Maharashtra Assembly Election 2024 – मिंधे, दादा आणि फडणवीसांना पुन्हा दिल्लीचे समन्स

महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर जागावाटपावरून सुरू असलेला तिढा अधिकच वाढला आहे. भाजपने विश्वासात न घेताच मित्रपक्षांच्या जागांवर उमेदवार दिल्याची कुरबूर मिंधे आणि अजितदादा गटाच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे. काही ठिकाणी महायुतीकडून जाहीर झालेल्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिंधे, अजितदादा आणि फडणवीसांना दिल्लीला बोलावून घेतले आहे.

– कुलाबा मतदारसंघातील नाराज राज पुरोहित यांना आश्वासनाची गोळी देत शांत करण्याचा प्रयत्न केला गेला खरा, पण पुरोहितसमर्थक खरेच भाजपला निवडणुकीत मदत करतील का याबाबत साशंकता आहे.