श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे दुसऱया सामन्यातही वेस्ट इंडीजचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजने शेरफेन रुदरपर्ह्डच्या 82 चेंडूंतील 4 षटकार आणि 7 चौकारानिशी ठोकलेल्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद 189 धावा केल्या होत्या. त्याने 8 बाद 58 अशी केविलवाण्या अवस्थेतून विंडीजला बाहेर काढताना गुदाकेश मोतीच्या (50) साथीने नवव्या विकेटसाठी 119 धावांची विक्रमी भागी रचली होती. वानिंदु हसरंगाने 4 तर महिशा तिक्षणा आणि असिथा फर्नांडोने प्रत्येकी 3-3 विकेट टिपत विंडीजची दुर्दशा केली होती. मात्र रुदरपर्ह्ड-मोतीच्या झुंजार खेळीला श्रीलंकन फलंदाजांनी सहजगत्या मागे टाकले. चरिथ असलांकाच्या 62 धावांच्या खेळीमुळे लंकेने 39 व्या षटकांतच विजयी लक्ष्य गाठले आणि सलग दुसऱया विजयाची नोंद केली.