संयुक्त कुटुंबाच्या घरावर सुनेचा पूर्ण अधिकार नाही. जर सून नोकरी करणारी असेल, कमावती असेल तर तिला सासरच्या घरातून बाहेर काढले जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला. सासू-सासऱ्यांनी संयुक्त घरावरील हक्क नाकारल्यानंतर उच्चशिक्षित सुनेने न्यायालयात धाव घेतली होती. तिचे अपील न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी फेटाळून लावले. याचिकाकर्ती महिला उच्चशिक्षित एमबीए आहे. ती कंपनीत नोकरी करते. त्यामुळे तिला बेघर केले, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच या प्रकरणातील घरावर सासऱ्यांचा मालकी हक्क आहे. त्यांना म्हातारपणात घरातून बाहेर काढता येणार नाही. तसेच याचिकाकर्त्या महिलेला बेघर केलेले नाही, उलट तिला भाडय़ाच्या घराची पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
कोर्ट काय म्हणाले…
महिलेला सासरच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. महिलेच्या घरावरील हक्कासंदर्भात कायदेशीररीत्या तोडगा काढावा किंवा पर्यायी घराची व्यवस्था करावी.