अभिनेत्री सोनम कपूर हिने पती आनंद आहुजासोबत मिळून मुंबईतील प्रसिद्ध म्युझिक स्टोअर रिदम हाऊस खरेदी केले. यासाठी सोनमने 47.84 कोटी रुपये मोजले. हे म्युझिक स्टोअर कलाप्रेमींसाठी खूपच जिव्हाळ्याचे आहे. रिदम हाऊस हे 3600 स्क्वेअर फुटात वसलेले असून ते म्युझिक प्रेमींसाठी अड्डासुद्धा राहिलेले आहे. रिदम हाऊसला 2018 मध्ये बंद करण्यात आले होते. हे स्टोअर 1940 पासून कार्यरत होते.