जगभरात आता 6 जी टेक्नोलॉजीला लाँच करण्याची तयारी करत आहेत. लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 6 जी टेक्नोलॉजीसंबंधी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 938 जीबीपीएसचा डेटा ट्रान्समिशन वेग मिळवला आहे. जो सध्याच्या 5 जी टेक्नोलॉजीच्या तुलनेत 9 हजार पट जास्त आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने 50 जीबीचा कोणताही चित्रपट अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड करता येणार आहे. हे अल्ट्रा हाय स्पीड कम्युनिकेशन नेटवर्क भविष्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. शोधकर्ता झिक्सिन लियू यांनी या टेक्नोलॉजीची तुलना सिंगल रस्त्याच्या 10 लेन हायवेसोबत केली. ही टेक्नोलॉजी इंटरनेटच्या स्पीडला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल. डेटा डाऊनलोड आणि स्ट्रिमिंगचा वेग व्यापकपणे वापरता येईल. फ्रिक्वेंन्सी बँडचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ऑर्थोगोनल फ्रिक्वेंन्सी-डिविज़न मल्टिप्लेक्सिंगचा वापर केला आहे. त्यातून 938 जीबीपीएसचा वेग मिळवण्यात शास्त्रज्ञाला यश आले.
जपानही प्रयत्नशील
जपानमध्ये डोकोमो, नेक आणि फुजित्सू यांसारख्या कंपन्यांचे एक कन्सोर्टियम 6 जी डिव्हाइसवर काम करत आहे. जे 100 मीटरपर्यंत 100 जीबीपीएसच्या स्पीडने डेटा ट्रान्समिट करू शकतो. 6 जी नेटवर्कची शक्यता केवळ इंटरनेट वेग वाढवण्यापर्यंत मर्यादित नाही तर हे अब्जावधी डिव्हाइसला जोडण्याची क्षमता ठेवते. हे ड्रायव्हरलेस कार आणि स्मार्ट सिटीत महत्त्वाचे योगदान देणार आहे.