तब्बल पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष्य शी जिनपिंग यांची भेट, अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा

ब्रिक्स समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या वेळी दोन्ही देशांचे अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. जागतिक शांततेसाठी हिंदुस्थान आणि चीनचे संबंध महत्त्वाचे आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच आम्ही मोकळ्या मनाने चर्चा करून, पाच वर्षानंतर आमची भेट झाली आहे. जगासाठी आमचे संबंध महत्त्वाचे आहेत. एकमेकांचा सन्मान झाला पाहिजे असेही मोदी म्हणाले.

ब्रिक्स समिटच्या वेळी मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चाही झाली होती. रशियाच्या कजान शहरात मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. ब्रिक्स बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आधी आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाली.