नखे पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, नखांचा रंग बदलणे हे आरोग्याबाबत अनेक संकेत देतात. जर नखे गुलाबीऐवजी पांढरे होत असतील तर सावधान राहा.
अचानक जर नखे गुलाबी ऐवजी पांढरी होत असतील तर दुर्लक्ष करू नका. ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. योग्य आहार आणि नियमित काळजी घेतल्यास हे टाळता येऊ शकते. वास्तविक, नखांवरून आरोग्य सहज ठरवता येते. हात आणि पायांच्या नखांवर पांढऱ्या खुणा येण्याचे कारण ल्युकोनीचिया देखील असू शकते. यामध्ये नेल प्लेटचे गंभीर नुकसान होते. यामध्ये त्यांचा रंग बदलतो. नखे पांढरे होत असतील तर लगेच सावध व्हा.
नखे पांढरे होण्याची कारणे
1. मॅनिक्युअरचे दुष्परिणाम
मॅनिक्युअर केल्याने नखांच्या खाली असलेल्या त्वचेला नुकसान होऊ शकते. याला नेलबेड म्हणतात. यामुळे नखांवर पांढरे डाग किंवा खुणा दिसू शकतात. नखे मॅनिक्युअर करण्यासाठी तीक्ष्ण उपकरणे वापरल्यास, यामुळे देखील नुकसान होऊ शकते आणि पांढरे डाग दिसू शकतात, जे नखांना वारंवार होणारे नुकसान देखील सूचित करतात. यामुळे नखांना तडा जाऊ शकतात,आणि नखे कमकुवत होऊ शकतात.
2. फंगल इंन्फेक्शन
नखे पांढरे होणे हे फंगल इन्फेक्शन देखील असू शकते. जेव्हा वातावरणातील जंतू नखांच्या किंवा आजूबाजूच्या त्वचेच्या छोट्या भेगांमध्ये प्रवेश करतात तेव्हा फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे नखे तुटायला लागतात, जाड होतात, त्यांचा रंग पिवळा, तपकिरी किंवा पांढरा होतो.
3. औषधांचा समावेश
काही औषधे देखील नखे पांढरे होण्याचे कारण असू शकतात. यामुळे नखांवर पांढऱ्या रेषा दिसतात. या औषधांमुळे नखांची मंद वाढ, पातळ होणे आणि नखे तुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये केमोथेरपी, रेटिनॉइड्स, सल्फोनामाइड्स आणि क्लोक्सासिलिन सारख्या कर्करोगावरील अनेक औषधांचा समावेश असू शकतो.
4. कोणत्याही विषारी धातूच्या संपर्कात येणे
नखे पांढरे होणे हे तुम्ही आर्सेनिक आणि थॅलियम सारख्या विषारी धातूंच्या संपर्कात आल्याचे लक्षण असू शकते. जेव्हा तुम्ही दूषित अन्न खाता देता तेव्हा असे होऊ शकते. यामुळे नखांमध्ये Meiss रेषा नावाच्या पांढऱ्या पट्ट्या असू शकतात, हे नखे पांढरे होण्याचे कारण असू शकतात.