जनतेशी आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहणाऱ्या कैलास पाटील यांना विजयी करा, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रिक्षावाला, पानटपरीवाल्यांना आमदार मंत्री केलं. त्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याच पाप केलं, असा घणाघात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला. तसेच जनतेशी आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहणाऱ्या कैलासदादांना विजयी करा, असे आवाहनही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यावेळी केले.

एका सभेत संबोधित करताना ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना वर्षावरून मातोश्रीवर आणलं. यामुळे शिवसैनिकांसह सामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू जनता विसरणार नाही. निष्ठावंत आमदार कैलास पाटील  पन्नास-पन्नास खोक्यांवर, मंत्रीपदावर लाथ मारून एकनिष्ठ राहिले. ज्या निष्ठेने तुम्ही हा मतदारसंघ सांभाळलाय, आता त्याच पद्धतीने विरोधकांच्या छातीत धडकी भरली पाहिजे. काम करणाऱ्या माणसाचा सन्मान झाला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन कैलास पाटलांना विजयी करा, असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले.

धाराशिव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांना उमेदवारी निश्चित झाल्याने विधानसभेची व्युव्हरचना आखण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कळंब येथील साई मंगल कार्यालयात तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, दिपक जवळगे, प्रदिप मेटे, रामलींग आवाड, बालाजी जाधव, डिसीसी चे संचालक बळवंत तांबारे, प्रा. संजय कांबळे, बाजार समिती संचालक हानुमंत आवाड, भारत सांगळे, महिला आघाडीच्या कांचनमाला संगवे, रुक्सना बागवान, विश्वजीत जाधव, सागर बाराते, चत्रभुज टेळे, बाबासाहेब मडके, मधुकर बोंदर आदि उपस्थीत होते.