अजित पवार गटाची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्यात रंगणार लढत?

अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 38 उमेदवारांची नावे असून पहिल्याच यादीत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत स्वत:ची उमेदवारीही अजित पवार यांनी जाहीर केली आहे. अजित पवार बारामती मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहे. त्यामुळे बारामतीत काका-पुण्याची लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र युगेंद्र पवार यांच्यासह अनेकांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत. युगेंद्र पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरल्यास बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगताना दिसले.

महाविकास आघाडीचे जागावाटप ‘ओक्के’, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थोरात यांची यशस्वी चर्चा

अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती मतदारसंघावर सर्वांची नजर होती. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पहायला मिळाली होती. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.