विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघांत 16 लाख 44 हजार 119 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 8 लाख 71 हजार 940 तर महिला मतदार 7 लाख 72 हजार 63 आहेत. 188 तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे मतदार शहरातील तीन आमदार ठरविणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 29 ऑक्टोबर आहे.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आचारसंहिता मंगळवार (दि.15) पासून लागू झाली आहे. निवडणुकीची अधिसूचना आज (दि. 22) जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 29 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर साडेचार महिन्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 1 लाख नवमतदारांची नावे वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदार वगळण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत.
चिंचवडमध्ये 3 लाख 44 हजार 717 पुरुष तर 3 लाख 10 हजार 596 महिला आणि इतर 57 असे एकूण 6 लाख 55 हजार 370 मतदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 24 हजार 699 पुरुष तर 2 लाख 76 हजार 52 महिला आणि 97 इतर असे 6 लाख 848 मतदार आहेत. पिंपरीत 2 लाख 2 हजार 524 पुरुष तर 1 लाख 85 हजार 415 महिला आणि इतर 34 असे एकूण 3 लाख 87 हजार निवडणुकीची पिंपरी विधानसभा प्रसिद्ध मतदारसंघातील अर्जाचे 973 मतदार आहेत. वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथून होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, अर्ज स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप थेरगाव येथील महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरून होणार आहे. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप चिखली, पूर्णानगर येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय हॉल येथून होणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना यांची महायुती झालेली आहे. भाजपने चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत.
‘असा’ आहे निवडणूक कार्यक्रम
– निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस – 29 ऑक्टोबर
– उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – 4 नोव्हेंबर
– मतदान 20 नोव्हेंबर