मानवी आरोग्यास घातक असलेला अंमली पदार्थ गांज्याची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या इसमावर जालन्यातील बदनापूर पोलिसांनी कार्यवाही करत एका आरोपीस अटक केली. आरोपीच्या शेतीतून 22 लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
जालना जिल्हात अवैध गांजा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बदनापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा लागवड करणारे व बाळगणारे इसमावर कारवाई केली. बाहदुरसिंग रामप्रसाद महेर हा त्याचे खामगाव शिवारातील डोंगरावरील वडीलोपार्जीत शेती मधील कापुस व तुर लागवड केलेल्या शेता मध्ये अंमली पदार्थ गांजाची झाडे लावुन त्याची संगोपन व संवर्धन करीत होता. त्यानंतर पोलिसांनी बाहदुरसिंग याच्या शेतावर छापा मारला. त्याच्या शेतात एकूण गांजाची 185 लहान मोठे झाडे सापडले असून असा एकुण 21 लाख 57 हजार 500 रूपये किंमतीचा 86.300 कि.ग्रॅ. वजनाचा अंमली पदार्थ गांजा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाहदुरसिंग रामप्रसाद महेर यास अटक केली. सदर बाबत सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड या करित आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक
अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजय जैस्वाल, सफो संतोष सावंत, सफौ गोविंद डोभाळ, सफी कुंटे, पोहेकॉ सुभाष चव्हाण, पोहेकों प्रताप जोनवाल, पोहेकों अंकुश दासर, पोकों पुनमसिंग गोलवाल, पोकों पिल्लेवाड, पोकों शाबान तडवी पोकों किसन जाधव, पोका राम सानप यांनी केली आहे.