अनिल कपूर यांनी नाकारली पान मसाल्याची जाहिरात
67 वर्षिय फिट अभिनेते अनिल कपूर यांच्यावर काwतुकाचा वर्षाव होतोय यामागचे कारणही खास आहे. अनिल कपूर यांनी नुकतीच पान मसाल्याची जाहिरात नाकारली. एका मोठय़ा पंपनीला त्यांनी नकार दिला. सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन त्यांनी जाहिरात नाकारली. कितीही पैसे मिळाले तरी लोकांच्या आरोग्याला धोका होणार असेल अशा कोणत्याही उत्पादनाचा मी प्रचार करणार नाही, असे अनिल कपूर म्हणाले.
सेन्सेक्सची 930 अंकांनी घसरगुंडी
शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 930 अंकांनी म्हणजेच 1.15 टक्क्यांनी घसरून 80,220 वर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 309 अंकांची म्हणजेच 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 24,472 अंकांवर बंद झाला. मोठय़ा प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल पॅप म्हणजेच भागभांडवल 2,118 अंकांनी म्हणजेच 3.81 टक्क्यांनी घसरून 53,530 वर बंद झाले.
आता व्हॉट्सअॅप होणार तुमचा पर्सनल असिस्टंट
व्हॉट्सअॅपवर युजरला एक असिस्टंट दिला जाणार असून युजर्सच्या पसंतीनुसार ‘एआय चॅटबॉट’ वैयक्तिक असिस्टंट म्हणून कार्य करण्यास मदत करेल. डब्ल्यूएबेटाइन्पह्च्या अहवालानुसार, नवीन चॅट मेमरी फीचर युजर्सचे काही पर्सनल डिटेल्स म्हणजेच तुमच्या चॅटचे काही भाग आपोआप लक्षात ठेवेल. वाढदिवस, संभाषण शैली, अॅलर्जी, डायट्री प्रेफरन्स, पर्सनल इंटरेस्ट आदी वैयक्तिक गोष्टी लक्षात ठेवण्यास अनुमती देईल.
आठ दिवसांत 120 विमानांना धमक्या
गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा 30 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यात इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल उड्डाणांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 8 दिवसात आतापर्यंत तब्बल 120 हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री 4 विमानांना सुरक्षेसंबंधी अलर्ट मिळाल्याची माहिती इंडिगोच्या प्रवक्त्यांनी आज दिली.
तीन राज्यांतील शाळांना बॉम्बची धमकी
दिल्लीतील दोन, हैदराबादमधील एक तर तामीळनाडूतील दोन शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याची माहिती पेंद्रीय राखीव पोलीस दलाने दिली आहे. ही धमकी तीन शाळांच्या व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे पाठवण्यात आली होती. आज सकाळी बॉम्बशोधक पथक सर्व शाळांमध्ये पोहोचले. शाळा रिकामी करून तपास केला गेला. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही.
‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा देणाऱ्याला तिरंग्याला सॅल्युट ठोकावा लागणार
‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा देणाऱया आरोपीला मध्य प्रदेश हायकोर्टाने अजब शिक्षा सुनावली आहे. आरोपी फैझलला जामीन मंजूर करताना न्यायालयाने अट घातली की, त्याने महिन्यातून दोन वेळा स्थानिक पोलीस स्थानकात हजेरी लावायची. तसेच पोलीस स्थानकाच्या वर फडकत असलेल्या तिरंग्याला 21 वेळा सॅल्युट करायचा. हे करताना ‘भारत माता की जय’ अशा घोषणा द्यायच्या.
पाकिस्तान पाडणार कृत्रिम पाऊस
प्रचंड महागाई आणि सरकारी तिजोरी रिकामी होत चाललेला पाकिस्तान आता प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाङ्गी कृत्रिम पाऊस पाडणार आहे. लाहोर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रदूषण हटवण्यासाङ्गी कृत्रिम पाऊस पाडला होता. त्यावेळी तब्बल 350 कोटी खर्च आला होता. आता लाहोर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले. येथील प्रदूषणाचा एक्यूआय 394 दाखवण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान सरकार चिंताग्रस्त झाले आहे.
हिंदुस्थानी लष्करात 90 जागांची भरती
हिंदुस्थानी लष्करामध्ये विविध पदांसाठी 90 जागांची भरती केलीजात आहे. पात्र उमेदवार 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात बारावीमध्ये किमान 60 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच जेईई (मुख्य) 2024 च्या परीक्षेला बसणे देखील अनिवार्य आहे. उमेदवाराची जन्म तारीख ही 02 जानेवारी 2006 पूर्वीची आणि 01 जानेवारी 2009 नंतरची नसावी.