महिलांवरील अत्याचाराविरोधात शिवसेना आक्रमक; मीरा-भाईंदरमध्ये पोलीस ठाण्यावर धडक

मीरा-भाईंदर शहरासह राज्यभरात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मीरा- भाईंदर जिल्हा महिला आघाडीने पोलिसांकडे केली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. राज्यात प्रत्येक तासात महिलांवरील अत्याचाराच्या पाच घटना घडत आहेत. 2023 मध्ये राज्यात 7 हजार 521 महिलांवर बलात्कार झाला. मुंबई शहरात बाललैंगिक अत्याचाराचे मे महिन्यात सुमारे 509 गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्ह्यांचे हे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी महिला आघाडीच्या

संपर्कप्रमुख रोशनी गायकवाड आणि जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांवर धडक दिली. याप्रसंगी उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, प्राची सिंह-पाटील, अनिता रहाडे, क्षमा गांधी, शहर संघटक श्रेया साळवी, शिवानी देसाई, मनीषा भोपळे, कल्पना शिगवण, उपशहर संघटक चेतना महाकाळ, मीलन देसाई, स्नेहल मोरे, रश्मी महाडिक, विभाग संघटक रूपा कनोजिया, स्नेहल दळवी, सुशिला मेडगे, दीपाली गोळे, प्रविणा शिंदे, विभागप्रमुख शेखर पाटील, उपविभागप्रमुख संतोष पाडले, शाखाप्रमुख अमित सोनावणे आदी उपस्थित होते. दरम्यान महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालू नये, अशी मागणी जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी व्यक्त केली आहे.