सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे, तर चांदीचा प्रतिकिलो दर एक लाखाच्या जवळपास पोहोचला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 558 रुपयांनी वाढून 77 हजार 968 रुपये तोळा झाला आहे, तर चांदी प्रतिकिलो 4884 रुपयांनी वधारून 97 हजार 167 रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरात सोने प्रति 10 ग्रॅमसाठी 15 हजार रुपयांनी महाग झाले, तर चांदी 23 हजारांनी वाढली आहे.