देशभरात रोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे नवनवीन सुविधा आणते. मात्र प्रवाशांच्या वाईट सवयींचा मोठा भुर्दंड रेल्वेला बसतो. प्रवाशी रेल्वेत गुटखा- पान खाऊन थुंकतात. दरवर्षी पान-गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी रेल्वे 1200 कोटी रुपये खर्च करते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे नवीन योजना घेऊन येतेय. याअंतर्गत स्टेशन परिसरात स्पीटर कियोस्क उभारले जातील. देशभरात 42 स्टेशनवर स्पीटर कियोस्क उभारले जातील. त्यामध्ये थुंकण्यासाठी स्पीटुन पाऊच असतील. त्यांची किंमत 5 ते 10 रुपये असेल. प्रवाशांनी या स्पीटुन पाऊचचा उपयोग केला तर रेल्वेचा डाग सफाईवरील करोडोंचा खर्च वाचेल. सर्वसामान्य प्रवासी स्पीटर कियोस्कचा लाभ घेऊ शकतात.