राजस्थानच्या कोटा येथे सोमवारी दुपारी एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. यामध्ये बस रस्त्याशेजारी असलेल्या जवळपास 10 फुट खाली पडली असून अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला असून 50 मुलं जखमी झाली आहेत.
धावत्या बसचे अचानक स्टेअरिंग फेल झाली आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. बस 10 फुट खाली पडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या अपघातात जवळपास 50 मुलं जखमी झाले आहेत. तर एका मुलाची अवस्था गंभीर आहे. शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी घेऊन जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात काच तोडून मुलांना बाहेर काढण्यात आली आहे. कोटा उत्तरच्या वॉर्ड 29 पूर्व नगरसेवक लटूर लाल यांच्यानुसार, बस पलटल्यानंतर लोकांची गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.