खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने धमकी दिली आहे. 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या विमानांमध्ये हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या दरम्यान एअर इंडियाच्या विमानात प्रवास न करण्याबाबत इशारा दिला आहे.
पन्नूने ही धमकी अशावेळी दिली ज्यावेळी हिंदुस्थानला एकावेळी अनेक विमानांना बॉम्बने उडविण्याच्या खोट्या धमक्या मिळाल्या आहेत. हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये वाद सुरु आहे. हिंदस्थानचा आरोप आहे की, कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. तर हिंदुस्थान देशातील खलिस्तानी घटकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दहशतवाद्यांनी हरदीप सिंह निज्जर हत्येनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये, पन्नूने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात येणार असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ जारी केला होता. 19 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. या दिवशी एअर इंडियाने उड्डाण करू नका. एनआयएने त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, धर्माच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) विविध गुन्ह्यांचा आरोप केला आहे.