जगात हिंदुस्थान लोकसंख्येबाबत अव्वल ठरला आहे. देशाची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. तसेच देशभरात सक्तीच्या कुटुंब नियोजनाबाबतही चर्चा होत असते. आता याबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी देशातील वृद्धांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही आता नवविवाहितांनी 16-16 अपत्ये जनामाला घालण्याची वेळ आली आहे, असे विधान केले आहे. त्यामुळे आता पुन्हा लोकसंख्येबाबत चर्चा होत आहे.
चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत 31 जोडप्यांचे लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्यांनी नवविवाहितांना याबाबत आवाहन केले. आता नवविवाहित जोडप्यांनी 16 प्रकारची संपत्ती जमवण्याऐवजी 16 अपत्ये जन्माला घालण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आमची लोकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आमच्या लोकसभेच्या जागांवरही परिणाम होईल, त्यामुळे आपण आता 16 अपत्ये जन्माला घालण्याची वेळ आली आहे.
पूर्वी नवविवाहित जोडप्यांना 16 प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद देण्यात येत असता. मात्र, आता 16 प्रकारच्या संपत्तीएवजी 16 अपत्ये जन्माला घालण्याची वेळ आली आहे. याआधी रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाढत्या वृद्धत्वाबाबत चिंता व्यक्त करत दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबियांनी अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर स्टॅलिन यांनीही असेच वक्तव्य केले आहे.