जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले! गोदापात्रात 13 हजार क्युसेसचा विसर्ग

नाशिक भागात गोदावरी नदीला पूर आल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणाचा 27 पैकी 18 दरवाजे उघडून 12 हजार 576 क्युसेॊस जलविसर्ग केला जात आहे.

गेल्या महिनाभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची सातत्याने आवक सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू ठेवल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

त्यानुसार आज संध्याकाळी 6 वाजता प्रकल्पात 100 टक्के वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक आहे. 1522 फूट जलक्षमता असलेले हे धरण काठोकाठ भरलेले आहे.

या पार्श्वभूमीवर आज रात्री दरवाजा क्रमांक 10, 27, 18, 19, 16 व 21 असे एकूण 6 दरवाजे अर्ध्या फुटांवरून एक फूट वर करण्यात आले आहेत. एकूण 27 पैकी 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 12 हजार 576 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात केला जात आहे. त्यामुळे पैठण शहरासह तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या 14 गावांमध्ये महापुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. नदीच्या काठावर गुराढोरांना बांधून ठेवू नये. विशेषतŠ रात्री सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे.