टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे सत्र सुरूच आहे. ‘मेटा’नंतर आता नोकियाने कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. नोकियाने नुकतेच दोन हजार कर्मचाऱयांना कामावरून काढले. याशिवाय येत्या काळात युरोपमधील 350 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्याचा नोकिया कंपनीचा विचार आहे.
नोकियाचे ग्रेटर चीनमध्ये बीजिंग, शांघाय, हाँगकाँग, तैवान येथे अनेक कार्यालये आहेत. नोकियाने आधी घोषणा केली होती की, 2026 पर्यंत 80 करोड युरो ते 1.2 अब्ज करोड युरोची बचत करण्यासाठी 14 हजार कर्मचाऱयांना कामावरून कमी करावे लागेल. त्यातील दोन हजार कर्मचाऱयांना नोकियाने नुकतेच कामावरून काढले. 2023 मध्ये नोकिया कंपनीचे चीनमध्ये 10400 आणि युरोपमध्ये 37400 कर्मचारी होते. जेव्हा गेल्या वर्षी नोकियाने नोकरकपातीची घोषणा केली, तेव्हा कंपनीत एकूण कर्मचारी 86 हजार होते. सध्या कंपनीत 78500 कर्मचारी कार्यरत आहेत. आता 2026 पर्यंत कर्मचाऱयांची संख्या 72 हजार ते 77 हजारांपर्यंत करण्याचा कंपनीचा विचार आहे.