बीएसएनएलच्या सिम कार्डसाठी आता एटीएम

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आता आपल्या ग्राहकांना सिम कार्ड देण्यासाठी एटीएमची सुविधा आणली आहे. बीएसएनएलच्या या नव्या सुविधेमुळे बीएसएनएलचे कार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता स्टोअर किंवा दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. भारत मोबाईल काँग्रेस 2025 दिल्ली येथे बीएसएनएलने सिम कार्ड व्हेंडिंग मशीन सादर केले. हे मशीन एटीएमप्रमाणे काम करणार आहे. ग्राहक बीएसएनएल सेल्फ केअर ऍपच्या मदतीने कोणत्याही वेळी सिम कार्ड खरेदी करू शकतील. हे व्हेंडिंग मशीन रेल्वे स्थानक, विमानतळ अशा गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना सिम कार्ड मिळवणे अधिक सोपे होणार आहे. या नव्या सुविधेद्वारे बीएसएनएल कंपनी आपली ग्राहक संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच बीएसएनएल लवकरच देशभरात 4 जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. पुढील सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होईल. कंपनीने जवळपास एक लाख मोबाईल टॉवर्स 4 जी सेवेत अपग्रेड करण्याची योजना आखली आहे. सध्या 24 हजार टॉवर्सवर सेवा कार्यरत आहे. आत्मनिर्भर भारत मोहीमअंतर्गत बीएसएनएलने स्वदेशी टेक्नोलॉजीवर भर देण्याचा संकल्प केला.