बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी निलंबीत, चौकशी सुरू

अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी जे पोलीस कर्मचारी होते त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कर्मचाऱ्याविरोधात विभागीय चौकशीही केली जाणार आहे.

बाबा सिद्दीकी यांना वाय सुरक्षा नव्हती. पण त्यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस शिपाई ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन पोलीस कर्मचारी दिवसा असायचे. तर एक पोलीस शिपाई रात्रपाळीवर असायचा. दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी श्याम सोनावणे रात्रपाळीवर होते. आता सोनावणे यांना निलंबीत करण्यात आले आहे. कर्त्यव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हाच फटाकेही फोडण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला दिसले नाही अशी प्रतक्रिया सोनावणे यांनी दिली आहे.