सलामीवीर आयुष म्हात्रेच्या (176) दणकेबाज शतकापाठोपाठ दुसऱ्या दिवशी अनुभवी श्रेयस अय्यरच्या (142) शतकी खेळीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात 103.1 षटकांत 441 अशी धावसंख्या महाराष्ट्राच्या उभारली. महाराष्ट्राला गायकवाड, 126 घावांवर धसची नाबाद रोखल्यामुळे मुंबईला पहिल्या डावात 315 अर्धशतके धावांची मोठी आघाडी मिळाली.
महाराष्ट्राच्या सिद्धेश वाळुंजने 6 बळी टिपण्याचा पराक्रम केला. त्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाड व सचिन घस यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर उर्वरित 31 षटकांच्या खेळात 1 बाद 142 धावसंख्येपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋतुराज 80, तर घस 59 धावांवर खेळत होते.
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राची अतिशय निराशाजनक सुरुवात झाली. शार्दुल ठाकूरने दुसऱ्याच चेंडूवर सिद्धेश वीरला शून्यावर पायचित पकडून मुंबईला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर दुसरा सलामीवीर सिद्धेश वीर आणि ऋतुराज गायकवाड यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार करीत अधिक पडझड होऊ दिली नाही. सिद्धेशने 112 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी सजविली. ऋतुराजच्या 72 चेंडूंतील नाबाद 80 धावांच्या खेळीला 12 चौकार अन् एक षटकाराचा साज होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 142 धावांची अभेद्य भागीदारी करीत किमान दुसऱ्या डावात तरी मुंबईला आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिले.
त्याआधी, मुंबईने पहिल्या दिवसाच्या 3 वाद 220 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 127 धावांवर नाबाद परतलेल्या आयुष म्हात्रेने 176 धावा पटकाविल्या.. त्याने 232 चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत 4 टोलेजंग षटकारांसह 22 चेंडू सीमापार धाडले. शुक्रवारी 45 धावांवर नाबाद परतलेल्या श्रेयस अय्यरने 190 चेंडूंत 142 धावा करताना 12 चौकारांसह 4 षटकार ठोकले.
या दोघांच्या 200 धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने चारशेपार धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादव 7 धावांवर बाद झाला नाही तर मुंबईने आणखी मोठा धावांचा डोंगर उभारला असता. महाराष्ट्राकडून हितेश वाळुंजने सर्वाधिक 6 फलंदाज बाद केले. याचबरोबर प्रदीप दाळेला 2, तर सत्यजित बच्छाव व सिद्धेश वीर यांना 1-1 बळी मिळाला.