उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे 43 कबुतरे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी छतावरून घरात प्रवेश करत या कबुतराची चोरी केली. या कबुतराची किंमत बाजारभावानुसार, 40 हजार रुपये सांगितली जात आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी सोडून चोरांनी चक्क कबुतरांची चोरी केल्याने या चोरीची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.